ऋतुचक्र - २

ऋतुचक्राची सध्या काय झाली आहे दैना,
उकलू कसे हे कोडे मला उमगेना...

रणरणत्या उन्हात वळवाचा पाऊस यायचा,
लवकरच मी येत आहे अशी चाहूल देऊन जायचा...

आता मात्र तो नुसत्याच हुलकावण्या देतो,
अन महिना भर नुसतीच वाट पाहायला लावतो...

नको तेव्हा नको तिथे हवेचा पट्टा निर्माण होतो,
अन बळी राजा, हव्या असलेल्या पावसाला मुकतो...

एकीकडे बी पेरलेलं शिवार, फुलायला तयार असतं,
वाट पाहत पावसाची,  ते आतल्या आतच मरत असतं...

दुसरीकडे टप्पोरं पीक, वाऱ्यासंगे डौलत असतं,
पण अवकाळी पाउसाच सावट,
त्याला सारखं खुणावीत असतं...

तो नेमका त्याचवेळी धोsधोs कोसळतो,
डोळ्यासमोर, अगदी डोळ्यासमोर !!!
उभ्या पिकाला धरणी मध्ये मिसळतो...

झालं नुकसान, कंबर कसून सुद्धा भरत नाही,
सरकार मात्र आश्वासना शिवाय दुसर काही देत नाही...

ऋतुचक्राची सध्या काय झाली आहे दैना,
उकलू कसे हे कोडे मला उमगेना...

1 comment:

  1. are he tar ekdamch bhari.....ek number......vastav aanle ahes tu dolya samor...sadhya apan ya saglyashich samana karat ahot......ya rutuchakrala apanch karan ahot ....te pan lihi rutuchakra 3 ani he sagle neat honyasathi kay kele pahaije te lihi aata ......

    ReplyDelete