आनंद असो वा दुखः, शब्दात बांधता येत नाही,
त्याला म्हणतात मन...!!!
माणसाचा हाडाचा वैरी अन तितकाच जिवलग सखा,
त्याला म्हणतात मन...!!!
जे दोन जीवांना अखंड जोडण्याची किमया करते,
त्याला म्हणतात मन...!!!
कोणालाही दिसत नसलं तरी सारखं कुठेतरी जाणवत असतं,
त्याला म्हणतात मन...!!!
आणू रेणू पेक्षा लहान आणि ब्रह्मांडा पेक्षा मोठे,
त्याला म्हणतात मन...!!!