काय सांगू तुम्हाला तिच्या डोळ्यातले भाव,
कोणती देऊ मी उपमा त्यांना,
काय देऊ मी नाव.
सगळ्यामध्ये पाही जी भविष्यातील सृष्टी,
काय म्हणू सांगा, मी तिच्या त्या दृष्टी.
प्रत्येकाच्या गुणांची जी करते ती कदर ,
कसं सांगू तुम्हाला, तिची आहे खास नजर
नकळत साऱ्या गोष्टी दिसती ज्यांना,
काय म्हणू त्या चोरट्या कटाक्षांना
जेव्हा दिसे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक,
कशी सांगू तुम्हाला, तिच्या डोळ्यातली चमक
दुःखात असताना सुद्धा चेहऱ्यावर ठेवी तेज
पण कसे वर्णू तुम्हाला तिचे डोळे ते निस्तेज
काय सांगू तुम्हाला तिच्या डोळ्यातले भाव,
कोणती देऊ मी उपमा त्यांना,
काय देऊ मी नाव.