ऋतुचक्र - १

ऋतुचक्राची सध्या काय झाली आहे दैना,
उकलू कसे हे कोडे मला उमगेना...

वळवाचा पाऊस आता सुद्धा वेळेवरच येतो, पण
खट्याळ तो जरा उशिरानेच हजेरी लावतो...

पावसाने मात्र आपले चार महिने नाही सोडले
थंडी ने सुद्धा स्वतःचे चार राखून आहेत ठेवले...

मधल्या मधे ऑक्टोबर हिट कुठे हिरमुसली
बहुतेक थंडीच्या कडाक्यात ती गोठली...

सूर्य आता जरा जास्तच तापतो
उन्हाळा आहे उन्हाळा !!, हे हर घडी सांगतो...

ऋतुचक्राची सध्या काय झाली आहे दैना,
उकलू कसे हे कोडे मला उमगेना....

1 comment:

  1. sahi ahe re........pan thandi yavarshich ahe bar...magchya varshi ti hi hirmusali hoti..........suryane janu kahi dila dambun thevli hoti..........paus sange manavas zadanche pran gheto ............tar mi ata tumchya vinashcha marg banato..........rutu sange ,nisarga bole mala jau dya..........

    ReplyDelete