पहाटे पहाटे ठसे, चांदण्याचे राहिले,
अप्रतिम ते क्षण, लावण्याचे राहिले
भावना होत्या कैक, हरवलो होतो असा,
एक एक भावना, सांगण्याचे राहिले
स्तब्ध होतेच सारे, नि:शब्द आपण दोघे
शांततेचा तो आवाज, ऐकण्याचे राहिले
उजळल्या दाही दिशा, फुटले ते तांबडे
सौंदर्य ते मनात, कोरण्याचे राहिले
उद्याही त्याच क्षणांची, वाट मी पहातो
निसटता त्या मिठीतून, बोलण्याचे राहिले
-- मनराव
अप्रतिम ते क्षण, लावण्याचे राहिले
भावना होत्या कैक, हरवलो होतो असा,
एक एक भावना, सांगण्याचे राहिले
स्तब्ध होतेच सारे, नि:शब्द आपण दोघे
शांततेचा तो आवाज, ऐकण्याचे राहिले
उजळल्या दाही दिशा, फुटले ते तांबडे
सौंदर्य ते मनात, कोरण्याचे राहिले
उद्याही त्याच क्षणांची, वाट मी पहातो
निसटता त्या मिठीतून, बोलण्याचे राहिले
-- मनराव