उद्या

उद्या उद्या करता दिवस आपले सरत आहेत,
लोकं, न जाणो किती काम करत आहेत.

किती येक, चांगले वाईट बेत ठरत आहेत,
ते साधण्या मनाला वाट्टेल ते करत आहेत.

भविष्याचा विचार करता वर्तमान मरत आहे,
कोणाच्याहि नकळत तो भूतकाळात विरत आहे.

दिवसा मागून दिवस, वर्षा मागून वर्ष लोटत आहेत,
जिकडे तिकडे सगळीकडे काळच श्रेष्ठ ठरत आहे...

5 comments:

  1. समीर, भारी कविता आहे .एवढे भयानक सत्य अगदी थोडक्यात पण समर्पक मांडले आहेस.
    लगे रहो. असेच छान छान वाचायचे आहे. आता एक कथा होऊन जाऊ दे

    ReplyDelete
  2. good one again!!!

    ReplyDelete
  3. अरे वा! तुझाही मराठी ब्लॉग आहे हे पाहून आनंद झाला. कविता छान आहे. इतर पोस्टं निवांतपणे वाचेन.
    पुढील लेखनास शुभेच्छा.

    ReplyDelete