मध्ये एकदा मी आणि माझा मित्र, काही खरेदी निमित्त शनिपार जवळ गेलो होतो. खरेदी आटोपून झाल्यावर आमच्या पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही लक्ष्मिरोड वर पावगी वाड्यातील दुकनात (नाव आठवत नाही) गेलो. आमच्या नशिबाने तिथे पनीर रोल आणि बर्गर चांगला मिळाला (तेवढीच दुकानाची जाहिरात ) म्हणून मग त्यावर यथेच्छ ताव मारला. ते संपवून मग जवळच्याच एका अमृततुल्य मध्ये जाऊन दोन कटिंग सांगितल्या, कारण पुण्यात चहा प्यावा तर अमृततुल्य मधेच आणि ते सुधा कटींगच.
चहा आल्यावर त्याचा अस्वाद घेत आम्ही दोघेही त्या दुकानाबाहेर गप्पा मारत उभे असताना, तिथे एक वल्ली समोर येऊन उभी राहिली. तिने डायरेक्ट कॉलरला हात घातला, आमच्या पैकी कोणाच्या न्हवे तर स्वतःच्याच. कॉलर थोडीशी दुमडून आमच्या कडे बघितलं आणि प्रश्न फेकला, "अहो, या कॉलर वर टेलरच नाव आणि नंबर आहे का ?". मी आणि माझा मित्र एकदम स्तब्ध, एकदा आम्ही एकमेकान कडे पाहत होतो आणि एकदा त्या व्यक्ती कडे. काही सेकंदांनी भानावर आल्यावर मी त्याला (त्याच्या) शर्टच्या कॉलर वर लिहिलेलं नाव आणि नंबर सांगितला. त्याने हि एकदम शिताफीने तो त्याच्या मोबाइल मध्ये डाइयल करून घेतला.त्याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर मिळाल्यावर, धन्यवाद म्हणून शेजारीच असलेल्या जयहिंद दुकानं मध्ये तो माणूस भर भर निघून गेला. त्याला बघून वाटलं बहुदा त्याला टेलर बरोबर द्वंद्व खेळण्याची इच्छा होती. या सगळ्या मध्ये आमचा चहा पिण्याचा इंटरेस्ट कुठच्या कुठे पळून गेला आणि मागे राहिला तो हा किस्सा. चहा संपवून निघताना मित्राने लगेच पुष्टी दिली, 'फक्त पुण्यातच अस होऊ शकत'...
No comments:
Post a Comment