इडंबन


असावा सुंदर टीव्हीचा सेट,
बघताच मनात तो भरावा थेट

काळे काळे चौकोनी रिमोट लहान
वापरायला नको मला डोक्याला ताण
स्पीकर्सचा आवाज़ असो भारदस्त
कोपऱ्यात टीव्हीला शोभुन दिसतील मस्त

रियालिटी शो चा, नसे भडीमार
न्यूज़च्यानेल्स चा, नको त्याला भार
आईच्या मालीकांचा नसावा भड़का
कार्टून्सचा असावा कायम तड़का.

अशाया टीव्हीला असो एक बॅटरी
लाईट कधी जाईल नसे तिची खात्री
पहायचा टीव्ही, आहे माझा छंद,
टीव्ही म्हणुन कधी पडू नये बंद

किती किती सुंदर टीव्हीचा सेट
बघताच मनात तो भरावा थेट

No comments:

Post a Comment