कोपरा

ओळखा पाहु मी आहे तरी कोण?

जिथे विश्वची एकच खोली,
अडगळीसाठी लागते माझीच बोली.


जिथे असतो रंग महाल,
सुंदर वस्तुंची शोभा वाढवुन, करतो मी कमाल.


दोन पाखरे, दोन पाखरे पड़तात जेव्हा प्रेमात,
स्वच्छंद विहार करताना असतात माझ्या शोधात.

दारू, जुगार आदि व्यसन, करणारे असतात लोक,
माझ्यापाशी येउन, पूर्ण करतात अपला शौक.

खाज़गी चर्चा करणारे माझ्यापाशी येतात सज्जन,
कटकारस्थाने करणारे मागे रहात नाहित दुर्जन.

लपंडाव, लपंडाव खेळता खेळता लहानपणी,
माझ्या जवळ द्डुन बस्तात कोणी कोणी.

ज्याला वाटे झाले अपूले जीवन आता जगुन,
त्रास नको कोणला म्हणुन रहातो माझ्या जवळ पड़ून.

असा मी आहे सर्वाँचाच लाडका,
नाही मी कोणाचाही, कोणाचाही दोडका....

ओळखा पाहु मी आहे तरी कोण?

No comments:

Post a Comment