जिक्र

काफ़ी यादों ने मिलके हमें बेज़ार बना दिया...
तेरे ज़िक्र ने उन यादों को बेकरार बना दिया...!!!

लम्हा लम्हा गुजरता था खाली वक़्त हमारा...
तेरे ज़िक्र ने इसे इंतज़ार बना दिया...!!!

बुझे बुझे से रहते थे लफ़्ज़ हमारे...
तेरे ज़िक्र ने इन्हें अंगार बना दिया...!!!

महज अल्फ़ाज़ों का मेला होते थे, गीत हमारे...
तेरे ज़िक्र ने इसे यादगार बना दिया...!!!

युं तो सभी दिलकश लगते थे नज़र आने पर...
तेरे ज़िक्र ने दिलकशी को प्यार बना दिया...!!!

कई ख्वाहिशें थी दिल्लगी करने की "समीर"...
तेरे ज़िक्र ने इसे मेरा कारोबार बना दिया...!!!

अजूनही आठवतं मला !!!

अजूनही आठवतं मला,
एक तानुली बहिण गादीवर खेळत असलेली
तीट लावलेल्या गालावर खळी ती पडलेली

अजूनही आठवतं मला,
तुझा हात हातात घेऊन, शाळेत सोडायला आलेलं
सुट्टीच्या दिवशी दोघे एकटे घरी राहिलेलं

अजूनही आठवतं मला,
पातेल्यातली साय आपसूक मिळायची
पण सायीच्या पातेल्यासाठी भांडणं व्हायची...
त्यातही बरोबरीची वाटणी असायची...अन
साय काढण्यासाठी आई नंबर लावून द्यायची

अजूनही आठवतं मला,
जी कथा सायीच्या पातेल्याची...
तीच तऱ्हा फोडणीच्या भाताची आणि तुपाच्या बेरीची

अजूनही आठवतं मला,
ते सायकलवर शाळेत सोडायला येणे... अन
आणायला आल्यावर पेरूवाल्या शेजारी
उभं राहून तुझी वाट पाहणे....

अजूनही आठवतं मला,
शाळा सुटण्याच्या वेळेला ते वंदे मातरम ऐकलेलं
अन तुला सायकलवर डबलसीट घेऊन घरी आलेलं

अजूनही आठवतं मला,
दिवाळीच्या वेळेला फटाक्यांची वाटणी असायची
आणि आधी कोणाचे संपतात यात शर्यत लागायची
अर्थात मीच नेहमी पुढे असायचो कारण,

अजूनही आठवतं मला,
मला फटाके वाजवूदेत म्हणून तू केलेली विनवणी
आणि तुझे फटाके संपवण्यासाठी मी केलेली मदत

अजूनही आठवतं मला,
तुझा दहावीचा लागलेला निकाल...अन मग
कॉलेजच्या अ‍ॅडमिशनसाठी भरलेला तो फॉर्म

अजूनही आठवतं मला,
सकाळ सकाळ तू कॉलेज ला गेलेली
क्लास बंक करून लवकर घरी आलेली

अजूनही आठवतात मला
अशा असंख्य आठवणी,
ज्या मनात कायम स्वरूपी राहतील
लांब असून सुद्धा तू कायम जवळच राहशील


असच काहीतरी

१) पारिजातकाचा सडा, गंधित वारा...
    त्यातून तुझा चालण्याचा तोरा...
    .
    .
    .
    काळीज तुडवताना तुला, अजि मी पाहिलं......


२) (हे पुणेरी मुलींसाठी  स्पेशल)
    करतेस घुसखोरी, मनात माझ्या...
    माजवतेस आतंक, मनात माझ्या...
    .
    .
    .
    निघतेस जेव्हा स्कुटीवर,स्कार्फ बांधून......


३) तिने जवळ,  अगदी जवळ येऊन, मुका घेतला
    रक्त भळाभळा वाहू लागलं
    .
    .
    .
    जळवांची मुका घेण्याची तऱ्हाच न्यारी

4) अजब असतात या कॉन्वेंटच्या शाळा
मॅरिड बायकांना, Miss म्हणून मुलं लावतात लळा.....

5) अपनी  नज़रोंसे  हर  एक  को  कतल  न  किया  करो,
किसी  एक  को  तो  छोड़ दो,
.
.
.
तुम्हे  जी  भर  के  देखने  के  लिए....


6) खुदही  को  समजना बहोत आसान  है जानम,
बस,  मुश्किल  यही  है  के,
.
.
.
कोई  कोशिश  नहीं  करता

7)   नसीब का खेल बड़ा अजीब होता है, माहजबीन
     कभी हम असलियत में भी गुमनाम रहा करते थे,
     मगर अब तेरे ख्यालों तक में जगह बना ली है....

कोशिश

बैठे है लेके सोमरस, यहाँ कोई रम नहीं
पीके जो शायरी करे, वो शायर हम नहीं...

इस दुनिया में और भी बहुत कुछ है
ये जहां बस दश्त-ए-गम नहीं...

सिखले तू दुःख से खेलना
या दुनिया कहे तुजमे दम नहीं...

परवाह न कर तू हार की
उसकी थैली में मौके कम नहीं...

मिले न मिले हमसफर राहे-जिंदगी में
चलता चला जा..मगर थम नहीं...

किल्ले पुरंदर


आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला 

मी: काय रे काय करतोयस ?
तुषार: काही नाही रे !!!  आराम चालू आहे.
मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ.
तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो. 
मी: ठीके !!!

          आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते. आपल्याला काय ??? दिवस कारणी लागल्याशी मतलब. सकाळी सकाळी ६.३० ला चांदणी चौकात भेटायचं ठरलं.
          ठरल्या प्रमाणे रविवारी सकाळी आम्ही ६.३० ला चांदणी चौकात भेटलो. बंगलोर हायवे ने, दोन बुलेट गाड्यांवर आरामशीर निघालो नारायणपूर कडे. वाटेत एके ठिकाणी मिसळपावचा समाचार घेतला. पोटोबा शांत झाले होते त्यामुळे दुपार पर्यंतची काळजी मिटली होती. 
रस्त्यावर येणारे जाणारे लोक वळून वळून बघत होते (आम्हाला नव्हे आमच्या गाड्यांना), जाम भारी वाटत होतं. सकाळ असल्यामुळे हायवेला गर्दीही फार नव्हती. ८.१५ ला आम्ही नारायणपुरात पोहोचलो. दर्शन घेतलं आणि तेवढ्यात आरती सुरु झाली. यथासांग आरती होई पर्यंत ९.०० वाजले. आता काय करायचा हा प्रश्न पडला. घरी परत जाण्याचा तर विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. मग मीच म्हणालो आलोच आहोत तर जाऊयात पुरंदरला. काहीहि आढे-वेढे न घेता मावळा तयार झाला याचं मला जरा आश्चर्यच वाटलं. पण असो लागलीच गाड्या काढल्या आणि मागल्या रस्त्याने पुरंदरची वाट धरली. मागे पुरंदरला जेव्हा आलो होतो तेव्हा वर जाण्याचा रस्ता फारसा चांगला नव्हता पण आता एकदम झाक केला आहे.
 एकदम टाररोड. अर्ध्या तासातच वर पोहोचलो. वर जाता जाता मधेच एक फोटो सेशन झालं. नुसतच गडीवर भटकून यायचं असल्याने कॅमेरा आणला नव्हता म्हणून मग मोबाइलनेच फोटो काढायला सुरुवात केली.   पावसाळा संपून बरेच महिने उलटले आहेत हे जिथे तिथे जाणवत होतं.



सगळीकडे एकदम रखरखीत. गडावर गेल्या गेल्या पहिला दृष्टीस पडला

 तो वीर मुरारबाजी देशपांड्यांचा पुतळा आणि त्यांची समाधी. ५ मिनिटे त्यांच्या स्मरणात घालवल्या नंतर पुढे निघालो. गाडी अजूनही बरोबर होती. पुढे बिन्नी दरवाज्यापाशी थोडा वेळ थांबलो. तिथेच मग शिवपर्वातल्या गप्पा सुरु झाल्या. त्या दरवाज्याची आजची अवस्था पाहता शिवकाळात इथून घोडे कसे वर येत असतील, इथे मावळे कसे लढत असतील याचं विश्लेषण सुरु झाले. गप्पा मारता मारता पुढे निघालो आणि एके ठिकाणी पोहोचलो जिथून गाडी पुढे नेता येत नाही.  गाडी लावली आणि गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीलाच पुरंदरेश्वराचं  मस्त देऊळ आहे. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि वर चढायला सुरुवात केली. २०-२५ मिनिटातच "सर" दरवाजा सर झाला. चढता चढता पुरंदरच्या तहाचा इतिहास डोळ्या समोर तरळत होता. मुघल आक्रमण कुठून झालं असेल. त्यांचं सैन्य किती लांब पसरलं असेल. वज्रगडावरून तोफांचा हल्ला कसा केला असेल. आपल्या मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता किल्ला कसा लढत ठेवला असेल याची गोळाबेरीज मनात चालू होती. असो, सर दरवाजा ओलांडून पुढे आम्ही फत्तेबुरुजा कडे जायला निघालो. बुरूजा कडे जाताना पुरंदर एकीकडे, पुढच्या बाजूने भकास वाटत होता पण दुसऱ्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूला अजूनही थोडी हिरवळ मे महिन्या मध्ये जळण्यासाठी तग धरून होती. आता पर्यंत घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.
 बुरुजाच्या टोकाला पोहोचल्यावर तिथे मस्त वारं सुटलं होतं. समोर वज्रगडाकडे पाहत थोडा वेळ तसाच उभा राहिलो. भर उन्हात सुद्धा तिथे थंडपणा जाणवत होता. पुन्हा माघे वळलो आणि सर दरवाजा कडे आलो. इथून पुढे आता केदारेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. तटबंदी अगदी नावाला राहिली आहे. पुन्हा पायपीट सुरु झाली. पाय वाटेवर एकही मोठे झाड नाही. रणरणत्या उन्हात तटबंदीच्या कडे कडे ने एक एक बुरुज बघत केदारेश्वर मंदिर गाठलं.

 केदारेश्वराच दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथे सावलीला आराम केला.  आता परत जायची वेळ झाली होती. आल्या पावली परत जायचं असल्यामुळे आणि त्यात थोडासाच गड उतरायचा होता त्यामुळे फारसा वेळ लागला नाही. तडक खाली आलो. मधेच शोर्टकट मारल्यामुळे संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण पहायचं राहून गेलं. गाडी लावली तिथे एक घर वजा हॉटेल आहे. भूक सणकून लागली होती. झुणका आणि भाकरीवर यथेच्छ ताव मारला. ताकाचे दोन दोन ग्लास रिकामे केले आणि बसलो गप्पा मारत. अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यावर गाडीला किक मारली आणि कुठेही न थांबता थेट चांदणी चौक गाठला. पुन्हा चौकात एक एक कॉफी मारली आणि घरला आलो. रामनवमीचा दिवस आनंदात गेला होता :)
 

बेडसे लेण्या....

          बरेच दिवस बेडसे लेणी पाहुन येण्याचे मनात होते पण योग जुळुन येत नव्हता. मित्राला शनिवारी फोन करुन विचारलं तर तो चालेल म्हणाला आणि अखेर या रविवारी तो (योग) आला. लेणी जवळच असल्यामुळे भल्या पहाटे उठुन जाण्याचा प्रश्नच नव्हता. असो सकाळी ९.०० ला घरुन निघालो आणि ९.४५ ला आम्ही लेणीच्या पायथ्याशी होतो.

वर चढुन जाण्यासाठी पुरातत्व खात्याने साधारण दहा वर्षापुर्वी नीट नेट्क्या पायर्‍या केलेल्या आहेत आणि त्या अजुनही शाबुत आहेत......

फार काही दमणुक न होता १५ मिनीटात वर पोहोचलो. हि लेणी तशी फार काही कार्ल्या भाज्या सारखी प्रसिद्ध नसल्यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. शांत आणि प्रसन्न वातावरण. वर चढताना आणखी एक व्यक्ती लेणी पाशी आहे हे कळत होते. वर पोहोचताच क्षणी त्यांनी थांबवलं आणि पोलीसी स्टाईल मधे प्रश्न केला "कुठुन आलात ??" उगाच माज दाखवतोय अस वाटुन मि पण मग त्याच माजाने जाता जाता त्याच्या कडे न बघता उत्तर दिलं आणि पुढे निघुन गेलो. आमच्या पाठोपाठ तोही आला आणि त्याने काहीही न विचारता जरा नरमाईनेच लेणी बद्द्ल, तिच्या इतिहासा बद्द्ल एकदम नीट सांगितलं. त्यात या लेण्या साधारण २२०० वर्षा पुर्वीच्या आहेत अशी माहिती मिळाली. बोलता बोलता कळलं कि त्यांना पुरातत्व खात्याने देखभाली साठी नेमलं आहे. असो

या स्तुपाचं काम बहुतेक अर्धवट सोडुन दिलं आहे..

लेणी प्रवेशाला रांगोळी सारखं नक्षी काम.. थोडं खराब झालं आहे.

लेणीतील खांब..

असे चार खांब आहेत. चारही खांबांना बुंध्याला माठाचा आकार आहे आणि सगळ्यात वर हत्ती, घोडे, बैल आणि त्यावर बसलेले स्त्री पुरुष असं कोरिव काम आहे.

माठाचा आकार.

पिंपळाच्या पानाचा आकार.

लेणी पुर्वाभिमुख आहे. त्यामुळे सकाळी लवकर गेलं तर या वरील भागातुन सुर्याची किरणे स्तुपावर पडलेली पहायला मिळतात.



हि दगडी खिडकी.

आत जाताना चोकटी वरचं नक्षीकाम. एक पाकळी दोन फुलांसाठी.

स्तुप




मधल्या दोन खांबाच्या वरच्या भागाचा आतुन काढलेला फोटु.

खांबाचा वरचा भाग

ब्राम्ही लिपी तील शिलालेख: "सामाधानिका नावाच्या राणीने पाण्याच्या टाक्या बांधल्या "

ध्यान करण्यासाठी बांधलेल्य चौदा खोल्या

खोली बाहेरील नक्षीकाम.

साधारण तास दीड तास हे सगळं पाहुन अम्हि परतीच्या वाटेला लागलो.

आठवण


आज बहोत दिनो बाद हात मे लिया ये जाम है !!!
कुछ दोस्तों को भेजना एक पयाम है !!!

आठवतं ??? तुम्हला ते, काहीही मतलब नसताना भेटणं...
मनात येइल तोवर, त्या कट्ट्यावर पडीक असणं...
आज मोबाईलने म्हणतात जग छोटं झालयं...
पण आपलं मतलबापूरता सूद्धा भेटणं राहुन गेलयं...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

आठवतं ??? ते,
रेलवेप्लॆटफ़ोर्मवर टवाळक्या करत घालवलेले तासनतास...
भेळेच्यारांगेत उभे राहून तिची लागलेली ती आस...
अतामात्र भेळवाला हि नाही, अन तो वेळही नाही....
काळाने, त्याच्या बरोबर नेले ते सर्वकाही....

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

आठवतं ??? तो,
कॊलेजच्या ग्राऊंडवर खेळण्यात घालवलेला वेळ...
अन तास संपण्याअधी येउन हजेरीचा बसवलेला मेळ...
आठवतं ???
ते घामेजलेले चेहरे घेउन, चार टाळकी असलेल्या वर्गात,
अगदि शेवटच्या बाकावर जाऊन बसणं...
अन म्याडमचं ते खूळ लागल्यागत सगळ्यांकडे पहाणं...
कसं मस्त होतं ते, बेभान होऊन मस्तीतलं जिणं...
परत एकदा जमेल का अपल्याला ति धमाल करणं...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!

निदान, एकदा तरी आपण परत भेटूयात...
जमेल तितक्या आठवणींची साठवण करुय़ात...

आज ये जाम उसि दोस्ती के नाम है !!!