मन...!!!

आनंद असो वा दुखः, शब्दात बांधता येत नाही,
त्याला म्हणतात मन...!!!

माणसाचा हाडाचा वैरी अन तितकाच जिवलग सखा,
त्याला म्हणतात मन...!!!

जे दोन जीवांना अखंड जोडण्याची किमया करते,
त्याला म्हणतात मन...!!!

कोणालाही दिसत नसलं तरी सारखं कुठेतरी जाणवत असतं,
त्याला म्हणतात मन...!!!

आणू रेणू पेक्षा लहान आणि ब्रह्मांडा पेक्षा मोठे,
त्याला म्हणतात मन...!!!

3 comments:

 1. mast re, tooza blog vachtana mala satat ase vatate ki tu marathicha gadha abhyasak aehs , karan marathi words evdhe hifundu astat tooze koni ghatale toola english medium madhye, nahitar lekhak zala astats leka.,..........

  ReplyDelete
 2. मन गुंतते मनातच, खुणगाठ घालता येते मनासच,

  मनापासून लिहिलेले पोहचते हृदयास,

  मनांपासून दाद देते ह्या लिखाणास!!

  धन्यवाद!!

  ReplyDelete
 3. mastach ... bahina baichya eka kavitechi aathavan zaali hi kavita vaachun ,...

  ...
  मन एवढ एवढ
  जसा खाकसचा दाना

  मन केव्हढ केवढ
  आभायात बी मायेना ..

  ReplyDelete