एक खुळा प्रयत्न

मूळ गीत-

डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ॥धृ.॥

आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी ॥१॥

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी ॥२॥

वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी ॥३॥

असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी ॥४॥

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गीतकार - मंगेश पाडगावकर
संगीतकार - यशवंत देव
गायक - अरूण दाते, अनुराधा पौडवाल

****************************************************************************

विडंबन-

बोळे कशासाठी? कशासाठी?
पाटीवर लिहून मिटून टाकण्यासाठी ॥धृ.॥

झाला करून अभ्यास, नको एकटा लिहूस
आली पेन्सील कशासाठी, पाटीला बिलगून विरून जाण्यासाठी ॥१॥

भाव तुझे मनातले, हलकेच उतरवले 
शब्द कशासाठी, पाटीवर लिहून भरुन काढण्यासाठी ॥२॥

बेल वाजवून गेली, मुले सैरभर झाली
शाळा कशासाठी, धुंद मनातून बहरु जाण्यासाठी ॥३॥

असा तुझा भरवसा, भावनांचा  कवडसा
बोटं कशासाठी, थोडे भरभरुन लिहून जाण्यासाठी ॥४॥

-- मनराव

No comments:

Post a Comment