लावणी

खेबुडकरांच्या लेखणीतून नांदते, ती लावणी
सुलोचना ताईंच्या आवाजातून डोलते, ती लावणी

ढोलकीच्या ठेक्यावर नाचते, ती लावणी
शाहिराच्या बोला बोलातून फुलते, ती लावणी

फडा सकट तंबू ही जेव्हा थई थई करतो, ती लावणी.
नुसत्याच शिट्या न वाजता फेटे हि उडतात, ती लावणी

सगळ्या रसांमध्ये समरस होते, ती लावणी
लावण्याला लावण्य शब्दात मांडते, ती लावणी

लोककलेत गणली जात होती, ती लावणी
नसलेल्या भोगकलेत फेकली गेली, ती लावणी

महाराष्टाच्या मातीतच जन्मली हि लावणी
त्याच मातीत आता जवळपास मिसळली हि लावणी ...